जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी क्रांतीकारी ठरत असून, या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था येथे स्मार्टच्यावतीने आयोजित विभाग व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीण देवरे, स्मार्ट प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त संचालक उदय देशमुख, आत्मा प्रकल्प संचालक सुनील बोरकर तसेच विविध जिल्ह्यांतील कृषी अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

