उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुष व महिला स्वतंत्र इमारतीची पुनर्बांधणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय आणि मध्यवर्ती इमारत क्र. २ च्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ करण्यासह वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, असे श्री. पवार यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, महिला व बालविकास डॉ. प्रशांत नारनवरे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता सुरेंद्र काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलकुमार मुंढे, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक सुनील पाटील आदी उपस्थित होते.

प्रस्तावित प्रादेशिक मनोरुग्णालय येथे २३ हजार २२९ चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळात बांधण्यात येणाऱ्या इमारतीत पुरुष व महिलांकरिता एकूण ९ कक्ष, कुटुंब कक्ष १, पुरुष व महिला आरोपीकरिता प्रत्येकी १ कक्ष,  लाँड्री, परिचारिका कक्ष, शवगृह असे एकूण १५ कक्षाचे बांधकाम करण्यात येणार आहे. इमारतीत एकूण १ हजार २९ खाटा असणार आहेत. या कामांकरिता १३१ कोटी ७४ लाख रुपयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नवीन कक्षाचे बांधकाम बेंगळरू येथील राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य व मज्जातंतू विज्ञान संस्थेच्या धर्तीवर करण्यात येणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *